Friday, November 22, 2024
Homeराजकीयउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार...प्रकरण काय आहे ते...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार…प्रकरण काय आहे ते जाणून घ्या…

न्यूज डेस्क – आज पुण्याच्या कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात यायला सुरुवात होईल, तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार करत असतांना आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान कसबा पेठ मतदार संघ हिंदुत्ववादी आहे. त्याच वेळी पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख करत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने पुण्येश्वर मंदिराच्या बाबत भूमिका स्पष्ट करावी असं म्हंटलं होतं. याच विधानाचा आधार घेत रवींद्र धंगेकर यांनी तक्रार केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन रवींद्र धंगेकर आरोप केला आहे. निवडणूक प्रचाराच्या वेळी धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केल्याचा मुद्दा मांडला आहे.

उपूमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा करत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी तक्रार दाखल करत निवडणूक आयोगाकडे रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहे. कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून हेमंत रासने यांना मैदानात उतरविण्यात आले होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: