Saturday, November 16, 2024
Homeराज्यपालकमंत्री विजयकुमार गावीत बेपत्ता असल्याची तक्रार...

पालकमंत्री विजयकुमार गावीत बेपत्ता असल्याची तक्रार…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली

भंडारा – सुरेश शेंडे

शहरात गेल्या अनेक दिवसा पासुन प्रशासकीय कामावर कुठल्याही प्रमाणात नियंत्रण नसुन शहरात प्रशासकीय कामे हे ‘राम भरोसे सुरु असून अनेक शासकीय यंत्रणेमध्ये अधिकाऱ्यांनी मनमर्जी प्रमाणे वागत असल्याने जिल्हयाचा विकास कामांना मोठा फटका बसत आहे. तर दुसरी कडे सामान्य माणसांचे साधे-साधे प्रश्न देखील अधिकारी वर्ग हे कुठल्याही प्रकारे गांभीयनि घेत नसल्याने सामान्य व्यक्ती अखेर कुणाकडे दाद मागावला जाईल.

शासनाच्या तिजोरीतील घरच्या तिजोरी समजून घोटाळा करणाऱ्या डॉक्टर यांच्या विरुध्द दिलेल्या घोटाळयाचे तक्रार जिल्हाधिकारी यांनी केचाराच्या टोपलीत टाकल्या सारखी असल्याने गेल्या ५ माहिण्या पासुन साधी कार्यवाहि देखील करीत नाहीत, जिल्हा पातडी वरील अनेक तक्रारी असून देखील आमचे पालकत्व स्विकारलेले विजयकुमार गावीत साहेबांना मिस्वःता २६ जानेवारीला भेट घेतली तेव्ही पासून आमचे पालकमंत्री हे भंडाऱ्यातुन बेपत्ता झाल्याने आमचा पालकमंत्री साहेबांशी कोणताही सांवाद झाला नाही.

पालक मंत्री साहेब बेपत्ता असल्याने भंडारा जिल्हयाचा विकास खुंटला असुन बेपत्ता असलेले आमचे पालक मंत्री मोहदयांना शोधून माझा संवाद घालून देण्या संबंधी पोलीस स्टेशनला बेपत्ता असल्याची तक्रार करीत शोधून संवाद घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तक्रार करते वेळेस निलिमा रामटेके, अथर्व गोंडाणे, ईश्वर कळंबे, बबन बुद्धे, राजा खान ,प्रमोद चौहान शरीफ खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते,

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: