Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeराज्यकळमेश्वर येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार...

कळमेश्वर येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार…

विहिरीत उडी घेवुन आत्महत्या

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

मालेगाव – कळमेश्वर येथील विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तिच्या भावाने मालेगाव पोलिसात दिली आहे त्या विवाहितेणें विहिरीत उडी घेवुन आत्महत्या आहे. चिवरा येथील किशोर महादेव सरकटे यांनी मालेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिलीकी त्यांच्या परिवारात त्यांची आई वडिल आणी तिन भाऊ त्यांचे तिन पत्नी व आमची सर्वाची मुले असे एकत्र राहतात.त्यांची आम्रपाली नावाची एक लहान बहिण होती तिने त्यांच्या मर्जीविरूध्द कळमेश्वर येथील गौतम मधुकर कंकाळ यांचेशी सन 2013 मध्ये प्रेमविवाह केला होता. तेव्हा पासुन त्यांनी तिचे सोबत आमचे संबंध तोडले होते.

ता 19 मे रोजीचे दुपारी 2.30 वाजताच्या दरम्यान त्यांना बहिण आम्रपाली हिने 9067121127 या मोबाईल क्रमाकावरून त्यांच्या मोबाईल क्रमाक 7666201225 वर फोन केला त्यावेळी ती फोनवर रडत होती तेव्हा त्यांनी तिला विचारले की, काय झाले तेव्हा ती त्यांना म्हणाली की, तिचा नवरा नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेतो तसेच तिला छोट्या छोट्या कारणावरून आमचे लग्न झाले तेव्हा पासुन तिला मारहाण करीत आहे असे बोलत होती तसेच तिने सांगितले की तिचे पती गौतम कंकाळ हा तिला म्हणत आहे की तु फारकत दे नाही तर तुझा जिव दे त्याला तिच्या सोबत रहायचे नाही त्याला दुसरे लग्न करायचे आहे असे तो तीला नेहमी म्हणतो तीपतीच्या त्रासाला कंटाळुन एकदिवस आत्महत्या करेल असे रडत रडत म्हणुन स्टेड तिने फोन कट केला.

दिनांक 26/05/2024 रोजी 11/00 वाजण्याचे सुमारास मला कळमेश्वर येथुन विजय सरकटे याचा फोन आला व त्याने मला सांगितले की, तुमची बहिण आम्रपाली गौतम कंकाळ हि विहीरीत ३०६ उडी मारून मरण पावली आहे असे सांगितले.

माझा बहिणीचा पती गौतम मधुकर कंकाळ यास दुसरे लग्न करता यावे म्हणुन तो आम्रपाली हिस फारकत मागायचा व त्यासाठी वेळोवेळी तिला मारहाण करायचा म्हणून त्याचे त्रासाला कंटाळुन तिने आत्महत्या केली आहे तिचे मृत्युस तिचा पती गौतम कंकाळ जबाबदार आहेत असे फिर्यादीत म्हटलेआहे गौतम कंकाळ यांच्यावर भादवी कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: