आकोट – संजय आठवले
संपूर्ण राज्यभर आपल्या वादग्रस्त विधानांनी अकलेचे तारे तोडणाऱ्या संभाजी भिडे या इसमाने अमरावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात आकोट शहर व तालुका काँग्रेस कमिटी द्वारे निदर्शने करण्यात येऊन आकोट शहर पोलीस ठाणे येथे भिडे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत संपूर्ण राज्यात संभाजी भिडे नामक व्यक्ती देशातील राष्ट्रपुरुष, राष्ट्र नायक, राष्ट्रनायिका यांचेबाबत अतिशय अनर्गल आणि बेताल वक्तव्य करीत फिरत आहे. संपूर्ण देश ज्यांना राष्ट्रपिता मानतो, त्या महात्मा जोतिबा फुले व महात्मा गांधी यांचे बाबत या विकृत मनोवृत्तीच्या ईसमाने अतिशय वादग्रस्त विधाने केलेली आहेत. या विधानांनी बहुजन समाज तथा बुद्धिजीवी वर्गात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.
परंतु तरीही राज्य शासनात समाविष्ट असलेले भाजप सेना सरकार भिडेंवर कोणतीच कारवाई करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यभर विविध राजकीय पक्ष, संघटना यांचे वतीने भिडेचा आणि शासनाचा निषेध करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर आकोट शहरातील शिवाजी चौक येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भिडे विरोधात निदर्शने केली. त्यानंतर भिडेवर कारवाई होणेकरिता आकोट शहर पोलीस ठाण्यात भिडे विरोधात कैफियतही दाखल करण्यात आली आहे.
यावेळी आकोट तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनोख राहणे, शहराध्यक्ष सारंग मालाणी, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर प्रमोद चोरे, जिल्हा सरचिटणीस संजय आठवले, राजेश भाल तिलक, बंडूभाऊ कुलट, सतीश हाडोळे, गजानन आवारे, मिलिंद झाडे, विजय अस्वार, अब्दुल मुबारक, गझमफर खान, अफजल खान, कालू मेंबर, युवक काँग्रेसचे प्रतीक गोरे, रोशन चिंचोलकर, अझहर शेख, राजू कुलट, वीरू तेलगोटे यांची उपस्थिती होती.