Monday, December 23, 2024
Homeराज्यएस.आर.के.इंडो पब्लिक स्कूल येथे स्पर्धेचे आयोजन...विद्यार्थ्यांनी साकारली वेशभूषा...

एस.आर.के.इंडो पब्लिक स्कूल येथे स्पर्धेचे आयोजन…विद्यार्थ्यांनी साकारली वेशभूषा…

सर्वच विद्यार्थ्यांनी घेतला स्पर्धेत सहभाग.

नरखेड – एस. आर.के इंडो पब्लिक स्कूल जलालखेडा यांच्या वतीने शाळेमध्ये प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यात वर्ग १ ली ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाबाई व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्न विद्यार्थ्याना विचारण्यात आले. ही स्पर्धा हाउस प्रमाणे घेण्यात आली आली. यात रेड हाउस विजयी झाला. प्रतेक प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याना बक्षीस सुध्दा देण्यात आले.

यात वेदिका गोरे हिने सावित्रीबाई, पूर्वी चौधरी हिने राजमाता जिजाबाई, पार्थ कराळे यांनी सभाजी राजे तर यश धर्मे याने स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा साकारली होती. यावेळी प्राचार्या शुभांगी अर्डक, प्रशांत येवले, नीलिमा वानखेडे, शकीला शेख, आश्विन रेवतकर, कविता शुक्ला, सुलोचना बोडखे, हेमलता गोरे, हेमंत ठोंबरे, नलिनी जीवतोडे, रक्षा शुक्ला, राधा घोरसे, रियाज पठाण, ज्ञानेश्वर सोनोने, पूजा राऊत, सरिता तिवारी, दीक्षा पावडे, सरुभी रावत, करिश्मा रावत, उमेश रेवतकर तसेच इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: