Saturday, September 21, 2024
HomeBreaking Newsपातुर | शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीला भीषण अपघात...दोन चिमुकल्यांसह...

पातुर | शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीला भीषण अपघात…दोन चिमुकल्यांसह ६ जण ठार…

पातुर – निशांत गवई

अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीला अपघात झाला असून यामधे ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर ही धक्कादायक घटना पातूर शहराजवळील घाटात घडली असून अपघात एवढा भीषण होता कि दोन्ही कार समोरासमोर भिडल्याने दोन्ही वाहनाचा चुराडा झाला आहे. या वाहनाने आमदार किरण सरनाईक यांचे दोन नातेवाईकंसह दोन चालकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.

पातुर येथील नव्याने निर्माण झालेल्या चार पदरी महामार्गावर आज दिनांक ३ मे रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान वाशिम कडून येणारी Mh 37 V 0511 डस्टर व आकोल्याकडून Mh 30 BL 95 52 ब्रिजा या वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन सहा जण ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त होत आहे वाशिम जिल्ह्यातील सरनाईक कुटुंब हे वाशिम कडून आकोल्याकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या पातुर तालुक्यातील आस्टूल येथील रहिवासी ठाकरे यांच्या वाहनांमध्ये जबर धडक होऊन यामध्ये रघुवीर अरुणराव सरनाईक वाशिम, शिवानी अजिंक्य आमले नागपूर , अस्मिता अजिंक्य आमले नागपूर व आस्टूल रहिवासी अमोल शंकर ठाकरे , सुमेध इंगळे सिद्धार्थ यशवंत इंगळे हे सहा जण या अपघातात ठार झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.

जखमी मध्ये पियुष देशमुख सपना देशमुख श्रेयस सिद्धार्थ इंगळे यांच्यावर अकोला येथे उपचार चालू आहे त्यांची तब्येत गंभीर असल्याची माहिती प्राप्त होत आहे अपघात होताच घटनास्थळी पातूर वाशी मोठ्या संख्येने घटनास्थळी पोचून जखमींना ताबडतोब अकोला येथील रुग्णालयात पाठवलेल घटनास्थळी पातुर पोलीस पोहचून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. अपघाताची भीषणता पाहता सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: