मेळाव्यास तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांचे जनजागृतीवर मार्गदर्शन…
गोंदिया : राजेशकुमार तायवाडे
निखील पिंगळे (भा.पो.से) पोलीस अधिक्षक, गोंदिया, नित्यानंद झा ( भा.पो.से) अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, यांचे नाविन्यपुर्ण संकल्पनेतुन कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी तसेच जातीय सलोखा कायम रहावा म्हणून मौजा दवनीवाडा येथे आज दिनांक- 15/12/2023 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांचे मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला….
जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांनी विविध दाखले देत याबाबत सविस्तर माहीती देवुन “भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांबाबत, अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारण अधि. २०१५ या कायदयाची माहिती, दोन समाजातील जातीयवाद व जातीय तीढा कश्याप्रकारे सोडवावा, सोशल मिडीयावर प्रसारीत होणारे जातीय विषयावरील चुकीच्या पोस्ट प्रसारीत होवु नये म्हणुन काय काय उपाययोजना कराव्यात याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आपले परिसरातील जनतेस जातीय सलोखा राखण्याबाबत आवाहन करण्यात आले तसेच याविषयी सविस्तर मार्गदर्शन करुन जनजागृती केली….
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष चेतलाल भगत, प. स.सदस्य अर्जुनी, लक्ष्मीताई श्रीबांशरी सरंपच ग्रा. प. दवनीवाडा, तसेच गुड्डू लिल्हारे, राजेश उरकुडे, अण्णा चौधरी, बंटी श्रीबांसरी, सतीशकुमार दमाहे सरंपच ग्रा. प. रतनारा तसेच पोलीस पाटील राजू कडव, खैरलांजी , पो.पा. शालु डोंगरे बलमाटोला., यांनी सदर विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस निरीक्षक सतीश जाधव पो.स्टे. दवनीवाडा यांनी केले. सदर कार्यक्रमास दवनीवाडा परिसरातील सर्व प्रर्वगाचे नागरीक, तसेच परीसराचे पोलीस पाटील व ईतर प्रतिष्ठीत गावकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन पो.हवा लितेश गोस्वामी यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक सुखदेव राऊत यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यास पो.हवा. धनेश्वर पिपरेवार , राजेश पारधी, पो.शि .स्वप्निल भलावी, यांनी कामगिरी केली.