खामगाव – हेमंत जाधव
महिला व बालकांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा व लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला ना फायदा मिळेल यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी सरपंच सचिव तलाठी कृषी सहाय्यक समूह संसाधन व्यक्ती अंगणवाडी सेविका आशा सेविका संगणक परिचालक ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम रोजगार सेवक पोलीस पाटील आरोग्य सेवक आरोग्य सेविका पोस्टमन कोतवाल यासह सर्वांनी प्रामाणिक पणाने प्रयत्न करावे असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या बुलढाणा जिल्हा सदस्य अनुजा सावळे यांनी जयपुर लांडे तालुका खामगाव येथील जि प शाळा अंगणवाडी केंद्रामध्ये 27 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह महिला बालकल्याण संदर्भातील माहिती देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
त्यावेळी बोलताना सावळे यांनी उपरोक्त आवाहन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस जे महाले सर हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते प्रमुख उपस्थितीमध्ये मनोज नगर नाईक विराट मल्टीपर्पज फाउंडेशन सेवाभावी दिव्यांग संस्था खामगाव अर्चना टाले माजी तालुकाध्यक्ष महिला कर्मचारी संघटना शत्रुण इंगळे प्रहार दिव्यांग शहराध्यक्ष मधुकर पाटील जिल्हा प्रतिनिधी दुर्योधन तायडे उपसरपंच शिवलाल उबाळे सदस्य शुभम लांडे संगणक परिचालक संघटना बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रणिती देवगिरीकर कविता इंगळे यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सो अंकिता शुभम लांडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी सैनिक यांच्या सुविद्य पत्नी पुष्पा लांडे यांचा अनुजा सावळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पुढे बोलताना अनुजा सावळे म्हणाल्या की केंद्र राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध विभागामार्फत विविध शासकीय योजना राबवीत आहे परंतु त्या योजनेची माहिती ग्रामीण भागातील महिला व बालकांपर्यंत पोहोचत नसल्याने ते या योजनेपासून वंचित राहत आहेत,
त्यामुळे शासनाच्या योजनांची प्रसार प्रसिद्धी करण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आपले कर्तव्य भावनेने कार्य केले पाहिजे असे सांगून यामध्ये येणाऱ्या अळी अडचणी सोडवण्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सांगितले यावेळी मनोज नगर नाईक एस जे महाले अर्चना टाले राजेश सावळे यांची समायोजित भाषणे झाली.
यावेळी संजय करंजकर शरद वानखडे रमेश सारोळकर राजेश सावळे राजकुमार पल्हाडे सुधाकर राऊत भाग्यश्री चौधरी शिक्षक वृंद किरण तायडे आशा सेविका लताताई तायडे कल्पना जाधव अंगणवाडी सेविका उषा पवार रंजना पवार मदतनीस गोपाल लांडे प्रकाश फुटकर पंजाब टाकरस जनार्दन लांडे श्रीकृष्ण लांडे सुरेंद्र पवार गावकरी विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महादेव पांडे यांनी केले.