Sunday, December 22, 2024
Homeराजकीयदफनभूमीमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यास कटिबद्ध - आमदार सुधीर गाडगीळ...ख्रिश्चन समाजाच्या...

दफनभूमीमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यास कटिबद्ध – आमदार सुधीर गाडगीळ…ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाला ग्वाही

सांगली – ज्योती मोरे

मुस्लिम व ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी शामरावनगर येथील सहा एकर जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. जागा दोन्ही समाजाच्या ताब्यात मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दफनभूमीमध्ये लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार सुधीर गाडगीळ यांनी ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाला दिली. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, नगरसेविका अप्सरा वायदंडे यावेळी उपस्थित होत्या.

दफनभूमीसंदर्भात ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार गाडगीळ यांची भेट घेतली. प्रा. राम कांबळे, मातंग समाजाचे आकाश तिवडे, मेजर सॅमसन तिवडे, पास्टर सुनिल मगदूम, पास्टर प्रभाकर सपकाळ, पास्टर विजय वायदंडे, पास्टर प्रकाश केंचे, पास्टर सुहास फाळके, सुर्य॔कांत लोंढे, आल्बर्ट सावर्डेकर, कुंदन केंचे, विजय तांदळे, आकाश पटेल, आकाश मद्रासी, सागर काळे आदी ख्रिश्चन धर्मगुरू व समाज बांधव उपस्थित होते.

आमदार गाडगीळ म्हणाले, दोन्ही समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न गंभीर आहे. शामरावनगर येथील जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ती पूर्ण होईल. त्यानंतर दफनभूमीध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ. वीज, पाणी सह दफनभूमीला संरक्षण भिंतही बांधून देऊ. आमदार स्थानिक विकास निधी मधून ख्रिश्चन समाजासाठी सामाजिक सभागृहही बांधून देऊ. दरम्यान समाजाचे कोणतेही काम असू दे ते प्राधान्याने करू अशी ग्वाहीही आमदार गाडगीळ यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: