कोल्हापूर – राजेंद्र ढाले
कोल्हापूर – प्रदीर्घकाळ बंद असलेली मुंबई विमानसेवा सुरू झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच या विमानसेवेसाठी पाठपुरावा करून सर्वतोपरी प्रयत्न करणारे सर्व आजी माजी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी विमानतळावरील अधिकारी यांचे विशेष अभिनंदन करीत कोल्हापूर – मुंबई विमानसेवा सुरळीत चालू व्हावी यासाठी माजी विमानतळ संचालक कमल कुमार कटारिया यांना निवेदन देऊन पाठपुरावा केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे करवीर तालुकाप्रमुख भीमराव गोंधळी यांनी नमूद केले.
तसेच सदर विमानसेवा तीन दिवसांऐवजी आठवड्यातील सातही दिवस अखंडितपणे सुरू राहण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा नूतन विमानतळ संचालक अनिल शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. मा.भिमराव गोंधळी करवीर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, अर्जुन कांबळे अध्यक्ष, प्रल्हाद गोंधळी महासचिव, संतोष कांबळे, संदीप गोंधळी उपाध्यक्ष, शिवाजी कांबळे, अशोक कांबळे, अविनाश कांबळे, काशिनाथ कांबळे,रवि कांबळे, शंकर कांबळे, सारंग कांबळे, उपस्थित होते.