न्यूज डेस्क : आकाशगंगेत न मोजता येणारे असंख्य तारे आहेत, त्यापैकी बर्याच ताऱ्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. जेव्हापासून मानवाने विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती विकसित केली आहे, तेव्हापासून ते तारे आणि अवकाशाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे आज मानव चंद्र आणि मंगळावर पोहोचला आहे. तर आता सूर्यही त्यांच्यापासून दूर नाही. तर आज एका धूमकेतूबद्दल सांगणार आहोत जो दोन दिवसांनी दिसणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो तब्बल चारशे वर्षांनीच दिसेल. म्हणजेच ही खगोलीय घटना मानवासाठी खूप महत्त्वाची आहे. मानव ते केव्हा आणि कसे पाहू शकतील ते जाणून घेवूया.
धूमकेतू निशिमुरा काय आहे
निशिमुरा धूमकेतूचा शोध १२ ऑगस्ट २०२३ रोजी लागला. हिदेओ निशिमुरा या जपानी खगोल छायाचित्रकाराने याचा शोध लावला. याच कारणामुळे या धूमकेतूला छायाचित्रकार निशिमुरा हे नाव देण्यात आले. दरवर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या सिग्मा हायड्रिड्सशी हा धूमकेतू संबंधित असू शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. जेव्हा हा तारा सूर्याजवळून जाईल तेव्हा तो धूळ आणि खडकांचे छोटे कण मागे सोडेल.
निशिमुरा हा धूमकेतू कधी दिसणार?
इंग्लंडमधील हल युनिव्हर्सिटीच्या ईए मिल्ने सेंटर फॉर एस्ट्रोफिजिक्सचे संचालक प्रोफेसर ब्रॅड गिब्सन म्हणतात की, हा धूमकेतू आपल्याला कोणत्याही दुर्बिणीशिवायही दिसणार आहे. शास्त्रज्ञांच्या मते, सध्या हा धूमकेतू ताशी 3.86 लाख किलोमीटर वेगाने पृथ्वीकडे सरकत आहे. यामुळेच १२ सप्टेंबर रोजी ते पृथ्वीपासून केवळ १२ कोटी किलोमीटर अंतरावर असेल आणि मानवांना ते उघड्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. 12 सप्टेंबर उजाडण्यापूर्वी भारतातील लोक निशिमुरा पाहू शकतील. म्हणजे पहाटे चार ते पाच या वेळेत तुम्ही तो पाहू शकता.