Sunday, December 22, 2024
Homeराज्यरेल्वे पुलाच्या खालून भुयारी मार्गा साठी आ.सुधीर गाडगीळ यांच्याकडे नागरिकांची मागणी...

रेल्वे पुलाच्या खालून भुयारी मार्गा साठी आ.सुधीर गाडगीळ यांच्याकडे नागरिकांची मागणी…

सांगली – ज्योती मोरे

सांगली माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पुलाच्या पुर्वेस पुला नजीक नाल्याचे सांडपाणी निचरा होण्याबाबत व पुलाच्या खालून आसपासच्या नागरिकांच्या दृष्टीने भुयारी मार्ग करण्याबाबत प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांनी कार्यसम्राट आ.सुधीर दादा गाडगीळ यांच्या कडे मागणी केली होती, मागणीस अनुसरून महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, स्थायी समिती सभापती धीरज सुर्यवंशी व संबंधित अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

नागरिकांनी आ. सुधीर दादांना निवेदन दिले.आ. सुधीरदादांनी तात्काळ सदर नाल्याचे सांडपाणी प्रश्न व रेल्वे पुला खालुन भुयारी मार्ग करण्याबाबत तात्काळ प्रस्ताव तयार करण्याबाबत संबंधित अधिकारी यांना आ. सुधीर दादांनी सुचना केल्या. यावेळी भाजप संघटन सरचिटणीस दिपक माने, माजी नगरसेवक रमेश सर्जे, विलास सर्जे, तसेच भागातील उपस्थित नागरिक प्रा.प्रकाश पाटील सर,

माजी नगरसेवक नंदकुमार देशमुख, महेश सांळुखे गजानन सांळुखे दिनकर पाटील, श्रीकांत पाटील, गिरीश शिंगणापूरकर,संजय पाटील सर,महेश चव्हाण वैभव कुलकर्णी,दिलीप पन्हाळकर , सतिश फोंडे, गोविंद सरगर, शिवाजी चोरमुले आनंदराव जाधव संजय पाटील प्रसाद मोहिते, प्रतापराव मोकाशी, शशीकांत मितुल,किरण आवळे, रविन्द्र बंगले रामचंद्र पाटील, दशरथ डोंबाळेव इतर नागरिक व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: