प्रतिनिधी हेमंत जाधव
खामगाव* ::- रखडलेल्या नवीन पाणी पुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार येत्या दोन महिन्यात शहरवासीयांना मुबलक पिण्याचे देणार असे ठोस आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी दिले. 25 फेब्रुवारी रोजी खामगाव शहरात आ अँड फुंडकर यांचे शुभहस्ते 11 कोटी रुपये खर्चाच्या विविध 34 विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी प्रभाग 3 मधील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, शहाराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, माजी नगराध्यक्षा सौ अनिता डवरे, माजी न प उपाध्यक्ष महेंद्र रोहनकार, मुन्ना पुरवार, न प सदस्य सतीशअप्पा दुडे, सौ अर्चना टाले, महिला आघाडी शहाराध्यक्षा सौ रेखा जाधव, भाजयुमो शहाराध्यक्ष राम मिश्रा, विध्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, संतोष टाले, वैभव डवरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आ अँड आकाश फुंडकर म्हणाले की गेल्या 14 वर्षांपासून रखडलेली नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यातच शहरवासीयांना मुबलक पिण्याचे शुद्ध पाणी देऊ असे आश्वासन दिले. शहर असो ग्रामीण भाग सर्वाना पिण्याचे पाणी मिळवुन देण्याचे काम जोरात सुरू आहे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल, हर घर जल मिशन द्वारे अनेक गावात पाणी पुरवठा योजनेचे काम जोमात सुरू आहे. गेल्या आठ वर्षांत झालेल्या सिंचनाच्या कामांमुळे टँकरमुक्त खामगाव मतदार संघ होत आहे, आधी डिसेंबर मधेच गावात टँकर सुरू करावे लागत परंतु तीन वर्षांपासून ते चित्र आम्ही बदलविले आहे. याच प्रमाणे रस्ते, नाल्या , बगीचे असे विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहे, सुरू आहेत, आणि येत्या काळातही सुरूच राहणार अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली, तसेच नागरिकांना रस्ते, वीज ,पाणी या मूलभूत सुविधा देत आहोत याच आम्हाला समाधान वाटत आणि तीच शाबासकी असे समजून विकासाचा झंझावात खामगाव मतदार संघात सुरूच ठेवणार असेही अँड आकाश फुंडकर यावेळी म्हणाले. यावेळी प्रभाग 3 च्या वतीने आ अँड फुंडकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सौ अनिता डवरे, संजय शिनगारे , मुन्ना पुरवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन विनोद नखात तर आभार प्रदर्शन रोजतकर सर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.