Sunday, December 22, 2024
Homeसामाजिकआ. अँड. फुंडकरांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा...

आ. अँड. फुंडकरांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा…

खामगाव – पवित्र रमजान ईद निमित्त ईदगाह मैदानावर जाऊन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. भाजपच्या वतीने आज रमजान ईद निमित्त सजनपुरी येथील ईदगाह मैदानावर आयोजित विशेष नमाज साठी आलेल्या मुस्लिम बांधवांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

नमाज अदा झाल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांचेसह भाजप पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत आलिंगन देऊन पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप जिल्हा चिटणीस संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, अनिस जमादार, शोहरतभाई, वासिक नावेदसर,

भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, भाजप अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष मो फईम (राजा) , गुलजमा शाह, विनोद टिकार, वसंतराव वानखडे, अरुण अकोटकर, अरुण सुडोकार, प्रदीप हरमकर, गजेंद्र गायकी, सै नजीब, शेख मुज्जू, मो अजहर, अयाज खान, खेमाजी, अस्लम गवळी, आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: