Thursday, January 9, 2025
Homeगुन्हेगारीसांगली जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन...

सांगली जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन…

सांगली – ज्योती मोरे

सांगली जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील 25 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी वस्तीच्या 26 ठिकाणी रात्री एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले.

सदर ऑपरेशन मध्ये स्वतः पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, २२ पोलीस अधिकारी, आणि एकूण 185 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला होता.

रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, फरारी आणि हवे असलेल्या आरोपींचा शोध घेणे, वॉरंटमधील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे तसेच जेल रिलीज आरोपी आदींचा शोध घेऊन संशयीतांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी दिल्या होत्या. त्यानुसार हे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: