Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayनागपूरात महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या...सेमनरी हील्स बालोद्यान जवळची घटना...

नागपूरात महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या…सेमनरी हील्स बालोद्यान जवळची घटना…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर – सेमनरी हील्स येथील बालोद्यान समोरील ठीकाणी हर्ष डांगे विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. महाविद्यालय वादातून ही हत्या करण्यात आली त्याचा मीत्रावर सुध्दा प्राणघातक हल्ला करण्यात करण्यात आला असुन त्यांची प्रकृती गंभीर आहे. हल्ला करणारेही विद्यार्थीच असल्याने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आठ आरोपिंना ताब्यात घेतले असून त्यात काही आरोपी अल्पवयीन असल्याचे आढळून आल्याने पोलीसांनी त्यांची नावे जाहीर केली.

हर्ष डांगे (२२,साईंगर,वाडी) मूत्काचे नाव असून तो वाडीतील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थी होता. तर अनीकेत कसर (२०,आडे ले आऊट) जखमी झाला असून तो जी.एच.रायसोनी पॉलिटेक्निकचा माजी विद्यार्थी आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन गटांन मध्ये लहानश्या गोष्टी वरुन वाद झाला.हर्ष व अनिकेत त्यांच्या मीत्रांन सोबत तेथून दुचाकी ने निघून सेमनरी हील्स परिसरात पोहचले तीथे मीत्राण सोबत बोलत असतांनाच दिपांशू व त्याचे साथीदार पोहचले हर्ष काही बोलण्याच्या अगोदरच त्यांनी शत्राने त्याचावर वार करण्यास सुरुवात केली.

यात तो गंभीर जखमी झाला.अनिकेतनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याच्यावरही आरोपिंंनी वार केले.दोघेही रक्ताचा थरोळ्यात पडल्याचे पाहत आरोपी पळून गेले.परिसरातील लोकांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली.पोलीसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.मात्र अतिरक्तस्त्रावामुळे हर्षचा मूत्यू झाला.अनिकेत गंभीर जखमी असुन त्याचावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मीळताच वरिष्ठ अधिकारीही गिट्टीखदान पोलिस ठाण्यात पोहचले चौकशी केली असता दीपांशू व त्यांचा मीत्रांचा यात सहभाग असल्याची बाब समोर आली.पोलीसांनी आपल्या नेटवर्क च्या माध्यमातून सर्व आरोपींना आपल्या ताब्यात घेतले.दरम्यान,या हत्येचा मागे नेमके कारण काय आहे.यासंदर्भात पोलीसांची चौकशी सुरू आहे.दिलेल्या माहितीनुसार मुलीशी निगडित कारणावरून वाद झाला व हल्ला झाला,अशी माहिती आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: