हिंगणा विधानसभेतील बोगस व दुबार मतदार मतदार यादी मधून वगळा याकरिता महाविकास आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
नागपूर – शरद नागदेवे
नागपूर -हिंगणा विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असून त्या याद्या दुरुस्त करण्यात याव्या याकरिता महाविकास आघाडीच्या वतीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे (पाटील), माजी आमदार प्रकाश गजभिये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे, युवा सेना कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे यांच्या नेतृत्वात 20 हजारापेक्षा जास्त दुबार मतदारांची व 30 हजारापेक्षा जास्त बाहेरील बोगस मतदारांची यादी नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांना निवेदना सह देण्यात आली.
निवेदनात प्रकाशित झालेल्या हिंगणा विधानसभेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असून हिंगणा विधानसभेमध्येच 20 हजार मतदाराचे नावे दोन दोन तीन तीन मतदार याद्यांमध्ये नावे आहेत म्हणजेच एक मतदार दोन वेळा तीन वेळा एकच मतदार संघात मतदान करेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर 34 हजारापेक्षा जास्त वर्धा, नागपूर शहर व हिंगणा विधानसभा क्षेत्राच्या उर्वरित नागपूर ग्रामीण येथील मतदारांची नावे हिंगणा विधानसभा क्षेत्राच्या मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
तर शिक्षणाकरिता राज्याबाहेरून, जिल्ह्याबाहेरून हिंगणा परिसरात वस्तीगृहात किंवा इतरत्र राहणारे विद्यार्थी व त्यांचे पालक, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी व त्यांचे मूळ गावी राहणारे किंवा नागपूर शहरात राहणारे नातेवाईक यांची नावे सुद्धा हिंगणा विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये जाणीवपूर्वक टाकल्या गेले आहेत त्यामुळे निवडणुका प्रभावित होऊन लोकशाहीला धोका निर्माण होईल तेव्हा हिंगणा विधानसभा क्षेत्रातील बोगस मतदारांबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्या बोगस मतदारांना मतदार याद्यांमधून वगळण्यात यावे असे म्हटले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुंदा राऊत, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे, शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मिथिलेश कनेरे, जि प माजी सभापती उज्वला बोढारे,जि प सदस्य संजय जगताप, नागपूर बाजार समितीचे उपसभापती प्रकाश नागपुरे, हिंगणा बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार )पक्षाचे हिंगणा तालुका अध्यक्ष योगेश सातपुते, नागपूर ग्रामीण तालुकाध्यक्ष संजय कुंटे, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख विष्णू कोल्हे, तालुका अध्यक्ष, प स माजी उपसभापती संजय चिकटे,
माजी जि प सदस्य रश्मी कोटगुले, हिंगणा पंचायत समितीच्या सभापती सुषमा कडू, प स सदस्य सुनील बोंदाडे, राजेंद्र उईके, अनुसयाबाई सोनवणे, पोर्णिमा दीक्षित , वैशाली काचोरे, रूपाली खाडे, उमेश राजपूत, लीलाधर दाभे, आशिष पुंड, शारदा शिंगारे, नलिनी शेरकुरे, प्रदीप कोटगुले, संतोष नरवाडे, मधु मानके, भीमराव कडू, शैलेश थोराणे, हरिभाऊ रसाळ, पुरुषोत्तम डाखळे, गोवर्धन प्रधान,प्रशांत सोमकुवर, नारायण डाखळे, गुणवंता चामाटे, प्रवीण घोडे, प्रकाश कोकाटे, मुकेश ढोमणे, रोशन खाडे, संदीप नेहारे, श्याम फलके, विठ्ठल हुलके, दिनेश ढेंगरे, विलास वाघ, अनुप डाखळे, शंकर जांभुळकर, नीलकंठ कावळे, अतुल कडू, आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.