अमरावती – दुर्वास रोकडे
शासनाव्दारे समाजातील सर्व घटकासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत प्राध्यान्याने पोहचविण्यासाठी संबंधित विभागाने शर्तीचे प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज दिले.
जिलहाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे शासनाच्या विविध योजनेचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकिारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त माया केदार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.
श्री. कटियार म्हणाले की, शासनाव्दारे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. यापैकी मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तीर्थक्षेत्र दर्शन योजना, अन्नपुर्ण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजना या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेचा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा. यासाठी संबंधित विभागाने विशेष मोहिम राबवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचावावा. कोणत्याही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यांची दक्षता संबंधितानी घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले.