सांगली – ज्योती मोरे.
सांगलीतील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडत असलेल्या 36 व्या सांगली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्या हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्यासह सांगली उपविभागीय पोलीस अधीक्षक अजित टिके, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर, तासगाव उपविभागीय अधिकारी वैशाली शेंडगे, जत उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे.
तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ,राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशी, राखीव पोलीस उपनिरीक्षक मनीलाल पवार, विजय पानपाटील, स्पोर्ट्स इन्चार्ज स्वप्निल सावंत, रवी कांबळे, विवेक साळुंखे, रवींद्र पाटील, अभिजीत फडतरे, राकेश पांढरे, विविध खेळांचे पंच आणि खेळाडू उपस्थित होते.
सदर स्पर्धेत दीडशे पुरुष खेळाडू आणि 50 महिला खेळाडू असे एकूण 200 पुरुष- महिला खेळाडूंनी सहभाग घेतलाय. अथलेटिक्स,कबड्डी, जलतरण ,बॉक्सिंग ,कुस्ती, जुडो,हॉलीबॉल, खो-खो, फुटबॉल, हॉकी,तायक्वांदो, हँडबॉल अशा 14 प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत.