Tuesday, November 5, 2024
Homeराज्यऑनलाईन ठगांना बळी पडू नका - जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी फेसबुक पेजवरून...

ऑनलाईन ठगांना बळी पडू नका – जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी फेसबुक पेजवरून जनहितार्थ केली पोस्ट शेयर…

नांदेड – महेंद्र गायकवाड

वाढत्या ऑनलाईन फसवणूकीबदल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक महत्वाची पोस्ट जनहितार्थ टाकली असून त्यांनी त्या पोस्टद्वारे ऑनलाईन ठगांना बळी पडू नका असे आवाहन जनतेला केले आहे.

आजघडीला नांदेड जिल्ह्यात व सर्वत्र ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार मोठया प्रमाणात वाढत असून अनेकजण अमिषाला बळी पडत ऑनलाईन फसत आहेत. यात अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या ऑनलाईन फसवणूकी बदल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक महत्वाची पोस्ट शेयर केली आहे.

त्या पोस्ट मध्ये जिल्हाधिकारी म्हणतात की, मुळात फेसबुक ही आर्थिक व्यवहार करण्याची जागा नाही. त्यामुळे माझा किंवा कोणाचाही फोटो आणि इतर माहिती वापरणाऱ्या अकाउंट वरून पैश्यांची मागणी झाली किंवा फर्निचर विकायची ऑफर आली तर सरळ सरळ ते फसवणूक आहे म्हणून ओळखा.

अजिबात प्रतिसाद देऊ नका आणि रिपोर्ट करा. ज्याला पैश्यांची गरज आहे किंवा फर्निचर विकायचे आहे ती व्यक्ती तुम्हाला किमान फोन करेल.

असे म्हणत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ऑनलाईन ठगांना बळी पडू नका असे आवाहन जनतेला केले आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: