Sunday, December 22, 2024
Homeराज्य‘बार्टी’ मार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; प्रवेश प्रक्रिया सुरु...

‘बार्टी’ मार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; प्रवेश प्रक्रिया सुरु…

अकोला – संतोषकुमार गवई

अकोला, दि. 25 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना www.barti.in या संकेतस्थळावरुन दिलेल्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे दिनांक 3 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार असून, विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन ‘बार्टी’चे महासंचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीसाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच बँकिंग (IBPS), रेल्वे. एलआयसी, इ. व तत्सम परीक्षा पूर्व प्रशिक्षण व पोलीस, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण या विविध स्पर्धा परीक्षांचे खाजगी नामांकित व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा 13 हजार रू. विद्यावेतन व एकरकमी आकस्मिक निधी देण्यात येईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग-राज्यसेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी व पोलीस, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान दरमहा अनुक्रमे रु.10 हजार रू. विद्यावेतन व एकरकमी आकस्मिक निधी देण्यात येणार आहे.

बँकिंग (IBPS), रेल्वे, एलआयसी, इ. व तत्सम परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा रु.6 हजार विद्यावेतन व एकरकमी आकस्मित निधी देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी विद्यार्थी निवड ही ऑनलाईन सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे होणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: