CM Hemant Soren : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) सोमवारी सकाळी झारखंड (Jharkhand) चे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (CM Hemant Soren) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. ईडीचे अधिकारी या प्रकरणी सीएम सोरेन यांची चौकशी करू शकतात.
यापूर्वी 20 जानेवारी रोजी केंद्रीय एजन्सी ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे त्यांच्या निवासस्थानी जबाब नोंदवले होते. यानंतर त्या दिवशी चौकशी पूर्ण न झाल्याने नव्याने समन्स बजावण्यात आले. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, तपास झारखंडमधील माफियांकडून जमिनीच्या मालकीमध्ये बेकायदेशीर बदल करण्याच्या मोठ्या रॅकेटशी संबंधित आहे. यापूर्वी ईडीने जमीन व्यवहार घोटाळ्यात हेमंत सोरेन यांची 29 ते 31 जानेवारी दरम्यान चौकशी करण्यासाठी वेळ मागितला होता.
ईडीने 22 जानेवारी रोजी समन्स पाठवले होते, सीएम हेमंत सोरेन यांना 25 जानेवारी 2024 पर्यंत एजन्सीला कळवण्यास सांगितले होते आणि 27 ते 31 जानेवारी दरम्यान चौकशीसाठी वेळ आणि ठिकाण निश्चित केले होते. यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन रविवारीच तेथून दिल्लीला रवाना झाले. आता सोमवारी ईडीची टीम त्याच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचली आहे.
#WATCH | Delhi: Outside visuals from the residence of Jharkhand Hemant Soren.
— ANI (@ANI) January 29, 2024
ED team is likely to question Jharkhand CM and JMM Executive President Hemant Soren in connection with a money-laundering case linked to an alleged land scam. pic.twitter.com/AsODa957Yx
ईडीने या प्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक केली असून त्यात 2011 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे. त्यांनी राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या संचालक आणि रांचीचे उपायुक्त म्हणून काम केले.