वाशीम : जिल्ह्यातील मानोरा तहसील कार्यालयातील कारकूनसह एकाला वाशीम लाचलुचपतविरोधी पथकाने ३० हजारांची लाच घेतल्या प्रकरणी अटक केली आहे. मोहन तिडके वय 50 वर्ष असे अटक झालेल्या कारकुनाचे नाव असून त्याचा दुसरा सहकारी जगदीश पृथ्वीराज चव्हाण वय 31 वर्ष यांनी सदर रक्कम स्वीकारली. दोघांविरुद्ध पोस्ट मानोरा येथे गुन्हा दाखल केला आहे.
हकीकत याप्रमाणे, यातील तक्रारदार यांचे मूळ गावी गावठाण क्षेत्रात असलेली शेतजमीन अकृषक करायची असल्याने त्यांनी तहसील कार्यालय मानोरा येथे रीतसर चलन भरून अर्ज केला होता सदर अकृषक परवाना देण्याकरीता आलोसे क्रमांक 1 यांनी फिर्यादी यांचेकडे 40000 /-रु ची मागणी केली पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे क्र.1 यांनी तडजोडीअंती 30,000/- रू. स्विकारण्यास तयारी दर्शवली आज रोजी प्रत्यक्ष सापळा कारवाई तहसील कार्यालयाच्या परिसरात आयोजित केली असता आलोसे क्रं 1 यांनी इलोसे क्रं 2 यांना पैसे स्वीकारण्यास पाठवले त्या प्रमाणे इलोसे क्र 2 यांनी फिर्यादी यांच्याकडून लाचेचे पैसे स्वीकारले वरून त्यांना व आलोसे क्रं .1 याना ताब्यात घेण्यात आले दोघांविरुद्ध पोस्ट मानोरा येथे गुन्हा दाखल केला आहे.
▶️ सक्षम अधिकारी
आलोसे क्रमांक 1व 2 मा. जिल्हाधिकारी सा. वाशिम
▶️ सापळा व तपास अधिकारी
श्री. महेश भोसले
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. वाशिम.
9028200444
पर्यवेक्षण अधिकारी
श्री.गजानन शेळके पोलीस उपअधीक्षक
ला.प्र.वि. वाशिम.
▶️ सापळा कार्यवाही पथक
श्री.गजानन शेळके पोलीस उपअधीक्षक, श्री.महेश भोसले , पोहवा नितीन टवलारकार, विनोद अवगळे , विनोद मार्कंडे, दुर्गदस जाधव पोलीस नाईक योगेश खोटे, रवी घरत,चापोशी शेख नावेद
मार्गदर्शन –
▶️१) मा. श्री.मारोती जगताप, पोलीस अधीक्षक ,
२) मा.श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक,
3) मा. श्री देविदास घेवारे,अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.
सर्व नागरीकांना आवाहन कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, वाशिम पोलीस उप अधीक्षक
@दुरध्वनी क्रं – 07252 235933
@टोल फ्रि क्रं 1064
- मोबाईल क्र.9028200444