Sunday, December 22, 2024
Homeराज्यन.प.पातूर कडून सेवा पंधरवाडा निमित्य स्वच्छता रॅली संपन्न...

न.प.पातूर कडून सेवा पंधरवाडा निमित्य स्वच्छता रॅली संपन्न…

पातूर – निशांत गवई

नगर परिषद,पातूर यांच्या वतीने सेवा पंधरवाडा निमित्य दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या पंधरवाडा निमित्त विविध जनसेवा व विशेष शिबिराचे आयोजन करत नागरिकांना विविध प्रकारचे दाखले व योजनांची माहिती होण्याकरिता न.प.चे प्रशासक व मुख्याधिकारी यांच्या निर्देशानुसार दि.२७ सप्टेंबर २०२२ ला सकाळी ९ वाजता न.प.मराठी शाळा क्र.१ पातुर पासुन स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामध्ये न.प.कार्यालय अधीक्षक सौ.क्षिप्रा लोणारे व मुख्याध्यापिका कु.स्वाती जोशी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन रॅलीला सुरुवात करण्यात आली. न.प.स्वच्छता अभियंता श्री महेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली रॅलीमध्ये साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ, पातूर यांच्या वतीने स्वच्छता अभियान व स्वच्छता हिच सेवा व सेवा पंधरवाडाबाबत माहिती होण्याकरिता दिग्दर्शक व लेखक विशाल राखोंडे लिखित व संचातिल संचप्रमुख युवा प्रबोधनकार सागर राखोंडे,शाहीर सुखदेव उपर्वट,

गजानन आवटे, गणेश देवकर, प्रज्वल भाजीपाले, महेश देवकर यांनी साथसंगत करून लोककला व पथनाट्य सादर करुन जनजागृती केली व गाडगे बाबांची वेशभुषा सिध्दांर्थ इंगळे यांनी करुन तर शाळेचा विद्यार्थांनी महात्मा गांधी व महापुरुषांच्या वेशभुषा साकारुन नागरीकांचे लक्ष वेधले. सदर रॅली ही न.प.मराठी शाळा क्र.१ येथून सुरवात होऊन शहरातून विविध चौकातुन फिरून शाळेमध्ये समारोप करण्यात आला.

यावेळी न.प.चे सर्व कर्मचारी व पदाधिकारी व न.प.मराठी शाळ क्र.१ मुख्याध्यापक एन.बि.झाडोकार व शिक्षकवंद आणि स्वच्छता व सफाई कर्मचारी तसेच कुमुदिनी रिर्सोसेस मॅनेजमेंट प्रा.ली.शाखा पातूरचे पर्यवेक्षक व अधिनस्त कर्मचारी व शाळेच विद्यार्थी मोठा प्रमाणावर सहभागी होऊन विविध संदेश देऊन लोकजागृती केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: