Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर शहरातील दोन गटात हाणामारी...पाहा व्हायरल Video

मूर्तिजापूर शहरातील दोन गटात हाणामारी…पाहा व्हायरल Video

वार्ताहर, अर्जुन बलखंडे

काल दिनांक ०८/०३/२३ ला दुपारी २:३० ते ३:०० या कालावधीत वक्रतुंड बेकरी, शाकंबरी चौक, मूर्तिजापूर दोन गटात हाणामारी झाली. त्यात दोन्हीं गटामार्फत मूर्तिजापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली. एका गटा मार्फत फिर्यादी विपुल संतोष गुंजाळ याने फिर्याद नोंदविली त्यात आरोपी १) जयेश सुपले २) सनी दुबे ३) वैभव कोकाटे ४) अक्षय कुरुमकर यांच्या विरोधात भां. द. वि. कलम ३२४,५०४.५०६,३४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

जखमी झालेल्या सिमन कराडे, साहिल गुंजाळ, सुजल गुंजाळ व जय चव्हाण यांना उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे उपचाराकरिता नेले असता जिल्हा रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले.

तर दुसऱ्या गटा मार्फत फिर्यादी जयेश सुपले याने फिर्याद नोंदविली त्यात आरोपी १) जयेश चव्हाण २) सुजल गुंजाळ ३) पवण गुंजाळ ४) साहील गुंजाळ यांच्या विरोधात भां. द. वी. कलम ३२४,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा मूर्तिजापूर पोलिस स्टेशनला नोंदवण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: