Sunday, December 22, 2024
Homeराजकीयमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नागरी सत्कार...जलालखेडा येथे केला सत्कार...

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नागरी सत्कार…जलालखेडा येथे केला सत्कार…

अतुल दंढारे
नरखेड (ता 29)

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जलालखेडा येथे पहिल्यांदा आगमन झाल्या बद्दल गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. शनिवारला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जागृत विद्यालयात वरूड येथे कार्यक्रमाला गेला असता परत येताना दुपारी 3 च्या सुमारास त्यांना जलाल खेडा येथे थांबवून बस स्थानक परिसरात नागरिकांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

जलालखेडा येथील काँग्रेस नेते तथा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वर्गीय दिलीप हिवरकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रद्धांजली दिली. गावकऱ्यांच्या वतीने गावाचे प्रथम नागरिक कैलास निकोसे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, खान नायडू, माझी ग्राम पंचायत सदस्य कुलदीप हीवरकर, प्रमोद पेठे,अतुल पेठे, प्रतिष्ठित नागरिक अनिल चौधरी, सुरेश बांद्रे, विनोद घोरमाडे, सामाजिक कार्यकर्ते दीपक गायकवाड, पत्रकार मेहबूब बानवा, साजिद पठाण, वीलास भालेराव, उमठा येथील सरपंच, प्रकाश घोरपडे, सचिन भिल्लंम , सुशील खुटाटे, चंद्रशेखर सोंनकुसके तसेच आजू बाजूच्या गावातील नागरिक ,कार्यकर्ते व गावकरी यावेळी उपस्थीतीत होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: