Sunday, December 22, 2024
Homeराज्यशहरातील विद्यार्थ्यांना मिळणार अमेरिकेतील स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी...

शहरातील विद्यार्थ्यांना मिळणार अमेरिकेतील स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी…

आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षेची घोषणा

शंभर टक्के शिष्यवृत्तीही मिळणार….

अकोला – उच्च शिक्षण घ्यायचे म्हटले की पालकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. या पार्श्वूमीवर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीमधील त्यांच्या यशस्वी करिअरची स्वप्ने पूर्ण करण्याकरिता अकोला शहरातील आकाश एज्युकेशन तर्फे इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना रोख पुरस्कारांसह शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली आहे. अँथे (आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम) असे या योजनेची थीम असून या अंतर्गत या वर्षी, यात एक वैशिष्ट्यपूर्ण बक्षीसाचाही समावेश करण्यात आला आहे. या परीक्षेतील पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे असणाऱ्या केनेडी स्पेस सेंटरच्या पाच दिवसांची सहल मोफत मिळणार आहे

यावेळी आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक मेहरोत्रा म्हणाले की, “असंख्य विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि क्षमतांमधील अंतर भरून काढण्यात आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झामने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या शिष्यवृत्ती उपक्रमाने यशस्वी १५ वर्षे पूर्ण केली असून, आम्ही आमचे अभ्यासक्रम देशभरातील विद्यार्थ्यांना प्रवेशयोग्य बनवण्यासाठी तयार केले आहेत.

आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम विद्यार्थ्यांना नीट आणि आयआयटी-जेईई परीक्षांची तयारी त्यांच्या स्वत:च्या गतीने करण्यास सक्षम करते. ते घरबसल्याही तयारी करू शकतात. आम्हाला यंदाच्या या उपक्रमात मोठ्या सहभागाची अपेक्षा आहे. आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्जवल भवितव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत.” असा माणसंही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विस्तृत कोचिंग प्रोग्रामचा फायदा होईल. याद्वारे विद्यार्थ्यांना नीट, जेईई, राज्य सीईटीसह एनटीएसई, ऑलिम्पियाड यांसारख्या विविध शिष्यवृत्ती परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते.

आकाशच्या देशभरातील सर्व केंद्रांवर ऑफलाइन परीक्षा

आकाश संस्थेच्या देशभरातील सर्व ३१५ हून अधिक केंद्रांवर २० आणि २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत ऑफलाइन परीक्षा होणार आहेत, तर ऑनलाइन परीक्षा १९ ते २७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत केव्हाही देता येतील. यासाठी विद्यार्थी त्यांच्या सोयीचा एक तासाचा स्लॉट निवडू शकतात.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: