Friday, November 22, 2024
Homeराज्यविष्णूपुरी बंधाऱ्याच्या सखल भागातील नागरिकांनी सावध असावे : जिल्हाधिकारी अभिजित राऊत...

विष्णूपुरी बंधाऱ्याच्या सखल भागातील नागरिकांनी सावध असावे : जिल्हाधिकारी अभिजित राऊत…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असणाऱ्या शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प ८३ टक्के क्षमतेने भरला आहे.त्यामुळे कधीही बंधार्‍याच्या दाराला उघडले जाऊ शकते. नदीपात्रात त्यामुळे विसर्ग वाढेल.प्रकल्पाच्या पुढील गावांनी सतर्क असावे, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

नांदेड जिल्हयातील शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आज दि. 25 रोजी 83% क्षमतेने भरला आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल, अशी सूचना पूर नियंत्रण अधिकारी यांनी केली आहे.

त्यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीवित्वाचे, पशुधनाचे,वीटभट्टी साहित्याचे नुकसान होणार नाही,यासाठी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: