Friday, November 22, 2024
Homeराज्यहक्काचा रस्ता आणि पाणी मिळविण्यासाठी नागरिकांचे आमरण उपोषण…

हक्काचा रस्ता आणि पाणी मिळविण्यासाठी नागरिकांचे आमरण उपोषण…

भातसानगर (शहापूर) – प्रफुल्ल शेवाळे

मुंबईला ला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरण क्षेत्रातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण आजपासून भातसानगर येथे सुरु झाले आहे.. सामाजिक कार्यकर्त्यां सखुबाई भस्मा यांच्या सह भातसा धरण क्षेत्रामधील विट्याचा पाडा परिसरातील नागरिकांनी आमरण उपोषण करण्याचं ठरवलं आहे..

सदर उपोषण भातसा जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर सुरु आहे.. याबाबत सखुबाई भस्मा यांच्या सोबत बातचीत केली असता त्यांनी.. हक्काचं पाणी आणि रस्ता मिळवण्यासाठी आपण सदर उपोषण करीत आहोत असं म्हटलं आहे..
प्रमुख मागण्या

1)मुरबी पाडा – विट्याचा पाडा ते आश्रम शाळा कोठेरा परिसरात पक्का रस्ता करणे..
2020 मध्ये शासनकडून सदर रस्ताकरिता जमिनीची लेव्हल करण्यात आली होती.. परंतु त्यानंतर शासनाकडून कोणतीही कामे करण्यात आली नाहीत.
2)जलसंपदा विभागाने भातसा धरणातून पाणी उचलून कोठेरा परिसरात जल सिंचन करावे.. यासोबत इतर मागण्या उपोषण कर्त्यांनी मांडलेल्या आहेत

उपोषणस्थळी शहापूर चे विद्यमान आमदार दौलत दरोडा आणि मा. आमदार पांडुरंग बरोरा यांनी भेट देऊन उपोषण कर्त्यांसोबत चर्चा केली…
यावर मा. आमदार पांडुरंग बरोरा यांनी रस्ता च्या लेवल बद्दल कार्यकारी अभियंता कार्यालय कडून लेखी निवेदन आणि इतर प्रश्नांकरिता शासनाकडून उपोषण कर्त्यांना नक्कीच लवकरात लवकर न्याय मिळेल असं विधान केलं आहे..

सदर प्रकरणी भातसा जलसंपदा कार्यकारी अभियंता श्री. पवार यांच्या सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.

सदर उपोषणची बातमी प्रसिद्ध करिता सहाय्यक म्हणून पप्पू भोईर स्थानिक शिवसेना शाखा अध्यक्ष (ठाकरे गट )यांनी विशेष सहकार्य केलं आहे.

Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: