पातूर – निशांत गवई
नवरात्र म्हणजे चैतन्य, उत्साह, मांगल्य या दिवसांमध्ये एक अलौकिक अनामिक शक्ती चराचरात वास करीत असते…… आपल्या लेकरांवर प्रेम, वात्सल्य, करुणा व माया यांची छत्रछाया ठेवणाऱ्या आईचा उत्सव म्हणजे नवरात्र…. सर्वत्र असणाऱ्या ऊर्जेचा संचार नकळतपणे सर्वांमध्ये होतो आणि आपणही या आदिशक्तीच्या जागरामध्ये तल्लीन होतो.जिजाऊ,सावित्री अहिल्या,आणि रमाई सर्व स्त्रीशक्ती याच आदिमायेची रुपे आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
घरातील सर्व कामे, वडीलधाऱ्यांची काळजी , आजारी मंडळीची सुश्रुषा करणारी अष्टभुजा, आपल्या चिमुकल्यांचा अभ्यास घेणारी ती सरस्वती, संसार चोखपणे करून किंवा जॉब करून घरात समृद्धीची भरभराट आणणारी लक्ष्मी ठरते, दुःखाचा संहार करणारी, संकटांना सामोरे जाणारी दुर्गा-काली हे सर्व स्त्रीचीच तर रुपे आहेत..
आपल्यातील सुप्त शक्तींना जागे करण्यासाठी आपल्यातील कलागुणांना वाव देन्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढून स्वत्वाचा शोध घेन्यासाठी. रितेश भाऊ फुलारी,सक्षम प्रतिष्ठान तसेच एज्युविला पब्लिक स्कूल पातुर तर्फे गरबा महोत्सवाचे आयोजन ०७/१०/२४ पासून ११/१०/२०१४ पर्यंत जिजाऊ सावित्री शक्तीपीठ कै तुकाराम गाडगे प्रांगण एज्यूविला पब्लिक स्कूल पातुर येथे आयोजन केले आहे.
मुख्य आकर्षण अभिनेत्री अनिता दाते आणि इंद्रायणी मलिकेमधील मुख्य बाल कलाकार अकोल्याचे भूमिपुत्र राघव गाडगे गरबा खेळायला १० आणि ११ तारखेला आणि कर्तुत्वान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी येत आहेत.