नांदेड – महेंद्र गायकवाड
शहरातील सिडको भागात एम. आय.डी. सी. असून या एम. आय. डी. सी त मोठया प्रमाणात उद्योगधंदे चालत असून कारखाना चालवीणाऱ्या उद्योजकांना व मजूर महिलांना चोरटे, मद्यपी व छेडछाड करणाऱ्यांचा मोठा त्रास होत असून या भागातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवावा अशी मागणी उद्योजक मित्र संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार नायक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड जिल्ह्यात व शहरात दिवसोंदिवस गुन्हेगारी वाढत असून या वाढत्या गुन्हेगारीमुळे जनसामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्हेगारीवर आळा बसविण्याचा मोठा प्रयत्न केला असून त्यांना कांही प्रमाणात यश हि आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी गुन्हेगारावर वचक निर्माण केली आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिडको एम आय डी सी मध्ये भर दिवसा महिलांची छेडछाड, रस्त्यात अडून पैसे काढून घेणे मोबाईल काढून घेणे. दारू पिऊन मारहाण करणे. धमकवणे. यासारखे गुन्हे घडत असून, या भागामध्ये अनेक पान टपऱ्या अवैधरित्या आहेत.या पान टपऱ्यावर गुटखा व दारू यासारखे नशेचे पदार्थ यासारखी विक्री होत आहे. एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये भर दिवसा चोऱ्या होत आहेत.
यामुळे एमआयडीसी मधील मजूर महिला मजूर तसेच उद्योजकांना या गोष्टीचा त्रास होत आहे. असे उद्योजक मित्र संघटनेच्या निवेदनात म्हण्टले आहे.वारंवारअसे गुन्हे घडत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे एम आय. डी. सी. भागातील उद्योजक मित्र संघटनेच्या वतीने या गुन्हेगारीवर आळा बसवावा अशी मागणी निवेदनाद्वारे निलेश मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नायक यांच्याकडे केली आहे.