Sunday, December 22, 2024
Homeराज्यचौकाला दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव - युवकांनी घेतला पुढाकार...

चौकाला दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव – युवकांनी घेतला पुढाकार…

नागरिकांनी दिली साथ.—– स्वखर्चातून तयार केले बोर्ड.—- मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती.

नरखेड – अतुल दंढारे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील वॉर्ड क्र 2 मधील युवकांनी या दिनाचे अवचित साधून वॉर्डातील चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव दिले. युवकांनी पुढाकार घेत व वॉर्डातील नागरिकांच्या सहकार्याने या चौकाला महाराजांचे नाव देण्यात आले. यासाठी युवकांनी स्वखर्चातून चौकात मोठा बोर्ड बनवला तसेच शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठा कार्यक्रम आयोजित करून चौकाचे नामकरण केले.

तसेच यावेळी शिवगर्जना, शिवघोषानं देत शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, माजी सरपंच प्रतिभा घोरमाडे, माजी ग्राम पंचायत सदस्य कुलदीप हिवरकर, सुधीर खडसे,अतुल पेठे, विनोद घोरमाडे, शुभम खोपे, रोहित घोरमाडे, प्रमोद कुंभारे, बबलू नागमोते, रोशन मेहतकर, मिथीलेश सातपुते, राजेश सातपुते, सूरज कवरे, अतुल सोनोने, आशिष कुवारे, निखिल कूवारे, प्रेम कवरे तसेच मोठ्या संख्येने महिला व शिव प्रेमी उपस्थिती होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: