रामटेक – राजु कापसे
रामटेक :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर शी संलग्नित ताई गोळवलकर महाविद्यालय रामटेक येथील बी.एस.सी चा विद्यार्थी अमेय अवथरे याची प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई येथील राज्यस्तरीय पथ संचलनासाठी निवड झाली आहे.
राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन केले जाते. मुंबई येथील प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विद्यापीठस्तरावर निवड स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून आठ विद्यार्थ्यांची सोलापूर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
सोलापूर येथील राज्यस्तरीय चाचणीतून ताई गोळवलकर महाविद्यालय रामटेक चा विद्यार्थी अमेय अवथरे याची मुंबई येथील पथसंचलनासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे विद्यापीठाचे व महाविद्यालयाचे नाव गौरान्वित झाले.
त्यांच्या या यशासाठी श्रीराम शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ कांचनताई गडकरी, संस्थेचे सचिव डॉ. प्रशांतजी पंडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रमोहनसिंह बिष्ट यांनी कौतुक केले.