ताथवडे – नुकताच ब्लॉसम पब्लिक स्कुल, ताथवडे येथे ‘बालगुणगौरव महोत्सव २०२३ साजरा करण्यात आला. प्राध्यपक व साहित्यिक संजय साहेबराव पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशक नितीन हिरवे, जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत व स्तंभ लेखिका सीमा खंडागळे (लोंढे) ,मुख्याध्यापिका स्वाती आरु ,उपमुख्याध्यापिका दीपा पवार ,कार्यक्रमाची अयोजिका समृद्धी सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.संजय पवार म्हणाले की,आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास म्हणजेच सराव केला पाहिजे.आज आपल्या आजूबाजूला अनेक संधी उपलब्ध आहेत.या संधीचा मुलांनी पुरेपूर लाभ घेतला पाहिजे व पुढे गेले पाहिजे.
मराठी भाषेची गोडी वाढावी म्हणून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जसे संस्कृत गीत,बासरीवादन,कविता वाचन,गायन,पखवाज वादन, भगवद्गिता श्लोक घेण्यात आले.ववगववगल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थ्यांना मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.