पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्याचे आराध्य दैवत श्री संत सिदाजी महाराज यात्रा महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम,भजन,कीर्तनाने भक्तिमय वातावरण या दहा दिवसात होत असते व दहाव्या दिवशी भव्य महाप्रसादाचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात येते.
हजारोच्या संख्येने भाविक महाप्रसादाचा लाभ ज्या प्रांगणावर घेतात त्या मैदानाची साफसफाई करण्यासाठी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यानी मदतीचा हात देत साफसफाई करून दिली व मंदिर परिसर अगदी स्वच्छ करून दिला. यासाठी शाळेतील वर्ग तिसरीचे व चौथीचे विद्यार्थी व त्यांचे वर्गशिक्षक सचिन अरबाड प्रांजली मेतकर ढोणे यांनी पुढाकार घेतला.
विद्यार्थ्यांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत श्री संत सिदाजी महाराज यात्रा पंचमंडळ व श्री सिदाजी महाराज संस्थान विश्वस्त मंडळ यांनी विद्यार्थ्यांना श्री संत सिदाजी महाराज यांचं चरित्र व व इतिहास सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व केलेल्या कार्याचे कौतुक म्हणून श्री सिदाजी महाराज विश्वस्त मंडळातील सदस्यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले तर वर्गशिक्षक सचिन अरबाड प्रांजली मेतकर ढोणे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी श्री सिदाजी महाराज संस्थान विश्वस्त मंडळाचे रामदासजी खोकले, महादेवराव गणेशे, मोहनराव पाटील, विठ्ठल लोथे, देवानंदजी शेवलकर, तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.