रामटेक – राजू कापसे
दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेक यांच्या वतीने जि.प.उ.प्राथमिक शाळा, कांद्री येथे पं. जवाहरलाल नेहरू यांच्या 133 व्या जयंती निमित्त बालक दिन व आद्य क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांची 228 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मुख्याध्यापक भास्कर जांभूळकर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सारिका मोटघरे यांनी केले.
यावेळी मंचावर सौ.ज्योती जांभुळकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुजाता नागदेवे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड, मौदा तालुका समतादूत ओमप्रकाश डोले व दुर्योधन बगमारे उपस्थित होते. विद्यार्थी प्रश्वी डोंगरे,आस्था ताकोद कथाकथन व चेतना रघुवंशी यांनी कविता गायन सादर केले. समतादूतांनी बालकांचे आरोग्य व शिक्षण यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून व्यसनमुक्ती, भूतप्रेत अंधश्रद्धा व बालकांच्या इतर विकासात्मक बाबींवर हितगुज साधले.