महेंद्र गायकवाड
नांदेड
शोधून मिळत नाही पुण्यं
सेवार्थाने व्हावे धन्य
कोण आहे तुजविण अन्य ?
‘आई’
तुजविण जग हे शून्य……
आई विषयी जेवढे लिहावं तेवढे कमीच परंतु हल्ली आई वडिलांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून शहरी भागासोबत ग्रामीण भागात ही असे प्रकार घडत आहेत चक्क जन्मदात्या आईलाच मुलाने घरा बाहेर काढल्याची घटना बरबडा येथे घडली असून आईने आपल्या दोन मुलाविरुद्ध तक्रार केली आहे.
नायगाव तालूक्यातील बरबडा येथिल सधन व शेतकरी कुटुंबातील रामबाई सटवाजी वटपलवाड या महिलेस तीनमुले ,सुना व नांतवंडे असा मोठा परिवार आणी शेती, घर असून देखील या वृद्ध मातेस पोटच्या मुलांनीच घरबाहेर काढल्याने आई होण्यापेक्षा मी वांज राहिलेलीच बरी होते असे रामबाईचे म्हणणे आहे.
बरबडा येथील रामबाई सटवाजी वटपलवाड यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांना तीन मुले आहेत.त्यांनी तीन ही मुलांना शेतीची समान वाटणी करून दिल्या नंतरही त्या मुलांनी आपल्या आईला वाऱ्यावर सोडले आहे. रामबाईने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हण्टले आहे की, मला तीन मुले असून आठ ते दहा वर्षपूर्वी माझ्या पतीचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यानंतर तिन्ही मुलांना समान वाटणी करून दिली. माझे मुले माधव व शंकर यांनी माझी दोन एकर जमीन करून खाण्यासाठी मला विनंती करून माझाकडून घेतली व मला घराबाहेर काढले.माझा तिसरा मुलगा भूमन्ना हा माझे पालन पोषण करण्यास तयार असून तो शेतात राहत असल्याने मी शेता राहू शकत नाही.त्या मुलाबद्दल माझी कांही तक्रार नाही .परंतु दोन मुलांनी माझी जमीन घेऊन माझे पालन पोषण केले नाही.उलट मला घराबाहेर् हाकलून दिले असल्याची तक्रार नायगावचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
मला माझी दोन एकर जमीन उदारनिर्वाह करणासाठी तसेच मला राहण्यासाठी एक रूम परत देण्यासाठी त्या दोन मुलांना आदेशीत करून माझे पालन पोषण ते करित नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रामबाई यांनी निवेदनाद्वारे केली याहे .सदरील तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड,उपविभागीय अधिकारी बिलोली व पोलीस ठाणे कुंटुर यांना देण्यात आल्या आहेत. प्रशासन या प्रकरणावर काय तोडगा काढेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.