विविध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याना केले बक्षीस वितरण.
नरखेड (ता.26) एस. आर.के इंडो पब्लिक स्कूल व सरस्वती विद्या मंदिर जलालखेडा या शाळेच्या संयुक्त विद्यमाने देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण शाळेचे पालक संचालक कुलदीप हिवरकर यांच्या हस्ते करण्यात आला. दोन्ही शाळेच्या वतीने देशभक्तीपर गीतावर नृत्य साजरे करण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांनी योगा व मलखांब चे प्रात्यक्षिक करून दाखवले. शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना शाळेचे पालक संचालक कुलदीप हिवरकर यांनी शासनाच्या नव्याने सुरू होणाऱ्या शिक्षण प्रणाली बाबत माहिती दिली. 25 विद्यार्थ्यानं पासून सुरू करण्यात आलेली शाळा आता 700 विद्यार्थ्यानं पर्यंत पोहचली असून पालकांच्या सहकार्यामुळे व शिक्षकांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
असेच सहकार्य पालकांचे नेहमी मिळावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. शाळेच्या प्राचार्य शुभांगी अर्डक यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती दिली तशीच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी बाबत मार्गदर्शन केल्या जाणार असल्याचे तसेच शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांची आरोग्य विषयी काळजी घेतल्या जात असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना रोज योगा व व्यायाम शिकवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शाळेचे पालक संचालक कुलदीप हिवरकर, माजी ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पेठे, सुधीर खडसे, शाळा समिती सदस्य श्रावण माकोडे, दीपक गायकवाड, चंद्रशेखर सोनकुसळे, माजी सरपंच प्रतिभा घोरमाडे, ग्राम पंचायत सदस्य रुपाली खडसे, कल्पना आखरे, सुधाकर चौरासे, प्रकाश दंढारे, मोतीराम बारापात्रे, मोहनसिंह राजपुरोहित, बालु त्रिपाठी, बबलू पाठक, प्राचार्य शुभांगी अर्डक, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर अंतुरकर, अनिता हिवरकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक यावेळी उपस्थित होते.फोटो ओळी. योगा चे प्रात्यक्षिक दाखवताना विद्यार्थी.