बाळापुर – सुधीर कांबेकर
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ व मानधन वाढ करण्यात यावे या साठी आज दि १३ डिसेंबर रोजी प्रशिक्षनार्थींनी तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी हे विविध विभागात ऑगष्ट व संप्टेबर पासून कार्यरत आहेत यांचा प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा आहे येणाऱ्या जाणेवरी – फेब्रुवारीत त्यांचा कार्यकाळ संपनार आहे त्यामुळे पुन्हा ते बेरोजगार होणार आहेत तर त्यांचे मानधन सुद्धा अल्प आहे तरी मानधनासह कार्यकाळ वाढवावा व प्रशिक्षणार्थींना शासकिय सेवेत अस्थापनेद्वारे रुजु करावे अशी मागणी बाळापुर परिसरातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर वैभव पांडे , गणेश गवई , विनित भारसाकळे , प्रितम बेदरे , पुजा घाटे (कांबेकर) , प्राजक्ता गायकवाड (खारोडे), हर्षा कापसे , प्रिती जावरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत