वाशिम – चंद्रकांत गायकवाड
मालेगांव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये श्री व्यंकटेश सेवा समिती वाशिमद्वारा संचालित बालविकास मंदिर प्राथमिक शाळा मालेगाव या शाळेने मालेगाव तालुक्यामधून प्रथम तर जिल्ह्यामधून तृतीय क्रमांक घेऊन पुन्हा एकदा आपला दर्जा सिद्ध केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून एकाच वेळी तालुकास्तर, जिल्हास्तर, विभाग स्तर व राज्यस्तर अशा वेगवेगळ्या स्तरावर ही स्पर्धा घेतली गेली. शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून सदर अभियान महाराष्ट्र शासनाद्वारे राबविले गेले. या अभियानामध्ये राज्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला. हे अभियान गत 45 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळी राबविल्या गेले.
त्याला एकूण 100 गुण होते. मूल्यांकनामध्ये सर्वप्रथम केंद्रस्तर, तालुकास्तर त्यानंतर जिल्हास्तर,विभाग स्तर आणि शेवटी राज्यस्तर अशा प्रकारचे क्रमांक देण्यात आले. तालुक्यात सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या शाळेस जिल्हास्तरावर संधी मिळाली. तर जिल्ह्यावर सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या शाळेस विभागावर संधी मिळाली.
विभागातून सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या शाळेला महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेमध्ये अनेक शाळा आपल्या संपूर्ण ताकदीनिशी उतरल्या होत्या. आपल्याकडे असलेले कसब, शक्ती पणाला लावून आपण कशाप्रकारे या अभियानामध्ये सर्वोत्तम कामगिरी बजाऊन सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेऊ अशा प्रकारचे प्रयत्न केले.
यामध्ये मालेगांव केंद्रामधून बालविकास मंदिर प्राथमिक शाळा खाजगी गटातून प्रथम क्रमांक घेऊन तालुक्याचे दार ठोठावले, तालुक्यामध्ये सुद्धा दमदार कामगिरी करून जिल्ह्याला पात्र ठरून तृतीय क्रमांक मिळवला आहे. गेल्या दीड महिन्यापासून शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे यांच्या मार्गदर्शनामध्ये झपाटल्या गत काम करीत होते व त्याचा चांगला परिणाम बालविकास शाळेत दिसून आला.
तालुक्यातून सर्वप्रथम आल्या नंतर आपली स्पर्धा जिल्ह्यामध्ये असल्यामुळे अजून सुंदर रीतीने प्रेझेंटेशन करून शाळेने जिल्ह्यातून सुद्धा तृतीय क्रमांकाने आपला दावा सिद्ध केला आहे. या अभियानामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेत वर्ग सजावट, विद्यार्थ्यांचे आरोग्य,शैक्षणिक गुणवत्ता,विद्यार्थ्यांना बचतीची सवय लावण्याकरिता बचत बँक,
कला गुण,क्रीडा गुण, बाल मंत्रिमंडळ, प्रधान मंत्री पोषण शक्ती योजना, विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती, महावाचन चळवळ, वक्तृत्व, लेखन, संगीत, कला एमसीसी स्काऊट, परिसर स्वच्छता, स्वच्छता मॉनिटर, आरोग्य तपासणी किशोरवयीन मुलींसाठी आरोग्याबाबत नियोजन, आर्थिक साक्षरता, भौतिक सुविधा, आधुनिक साधनांची उपलब्धता,
गावातील दानशूर व्यक्तींचे शाळांमध्ये सहभाग, शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका, तंबाखू मुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा, विद्यार्थी केंद्रित उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थी,पालक ,स्थानिक सेवाभावी संस्था यांचा सहभाग या उपक्रमाबरोबरच अनेक उपक्रम शासनाच्या निघालेल्या परिपत्रकानुसार शाळेत राबविण्यात आले.
त्यानुसारच शाळेचे मूल्यांकन होऊन बालविकास मंदिर प्राथमिक शाळेला तालुक्यातून प्रथम तर जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळाला आहे. या कामी शाळा समितीचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शाळेने मिळविलेल्या या यशाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष ॲड.मा.विजयराव जाधव साहेब,सचिव रंगनाथजी पांडे ,सुनीलभाऊ जाधव,
रामभाऊ जाधव अजिंक्यभाऊ जाधव व संस्थेतील सर्वच पदाधिकारी सर्व मुख्याध्यापक,शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे. या कामगिरीमुळे बालविकास मंदिर प्राथमिक शाळेकडे आदर्श शाळा म्हणून पाहण्यात येत येते आहे. यामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे, विध्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
परिसरामध्ये बालविकास मंदिर प्राथमिक शाळेच्या कामगिरीचे कौतुक केल्या जात आहे. सदर पारितोषिकाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे,शिक्षक नंदकिशोर भुसारी,विठ्ठल कुटे,अनिलकुमार सरकटे,वंदना गवई, जीजेबा घुगे,विजया भिसडे,गणेश शिंदे, इब्राहिम रेघीवाले,अमोल बोडखे,गणेश इढोळे,योगेश वाळूकर,संदीप कांबळे,सुषमा इंगळे,ज्योती मोरे ,अर्चना पोधाडे,पूजा गायकवाड, पायल मुंढरे या सर्वांनी अथक प्रयत्न करून यश संपादन केले.