रामटेक – राजू कापसे
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर पुरस्काराकरिता निवड झालेल्या शाळांना शिक्षण विभाग पंचायत समिती रामटेक द्वारा बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय घनश्यामराव किंमतकर सभागृह रामटेक येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. चंद्रकांत कोडवते सभापती, पंचायत समिती रामटेक तर प्रमुख पाहूणे म्हणून मा. संजय झाडे, मा. शांताताई कुमरे, मा. हरिषजी उईके जिल्हा परिषद सदस्य, मा. जयसिंग जाधव गटविकास अधिकारी,
मा.विजय भाकरे गटशिक्षणाधिकारी, मा. शालिनी रामटेके शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख विकास गणवीर, प्रकाश महल्ले, रामनाथ धुर्वे, रमेश पवार, चंद्रशेखर मायवाडे, प्रल्हाद कोवाचे, प्रमोद सुरोसे, सुरेश पडोळे सह विजेत्या शाळांचे व्यवस्थापक मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक,शिक्षक सह विद्यार्थी हजर होते.
यावेळी नागपूर जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा भिलेवाडा सह तालुका स्तरावरून शासकीय शाळा गटातून प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथ. शाळा गर्रा, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा सालई (हिवरा बाजार), तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथ. शाळा हातोडी व खाजगी शाळा गटातून प्रथम क्रमांक स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार, द्वितीय क्रमांक समर्थ प्राथमिक शाळा रामटेक, तृतीय क्रमांक स्नेहसदन मतिमंद मुला मुलींची विशेष शाळा शितलवाडी रामटेक या सात शाळांचा समावेश असून उपस्थित मान्यवारांच्या हस्ते स्मृती चिन्ह व धनादेशाचे वाटप करून सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.विजय भाकरे,गटशिक्षणाधिकारी पं.स. रामटेक यांनी केले तर सूत्र संचालन मा. विकास गणवीर, केंद्र प्रमुख शिवनी यांनी केले व आभार श्रीमती कविता उके, साधन व्यक्ती पं. स. रामटेक यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी परिश्रम घेतलेत.