Sunday, December 22, 2024
Homeराज्यराज्याचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार...

राज्याचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार…

शहापूर – प्रफुल्ल शेवाळे

राज्यात रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज शहापूर येथे केलं आहे.

शहापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नेते दिवंगत दशरथ तिवरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी शहापुरात आले होते. यावेळी शहापूर चे आमदार दौलत दरोडा यांच्या निवास स्थानि पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांनी सदर वक्तव्य केलं आहे.

शहापूर तालुक्यातील चोंढे, घाटघर, नगर याठिकाणी चे रस्त्याचे काम लवकर मार्गी लावू आणि तत्सम निधी शासनाकडून पारित करू असे नमूद केलं आहे.. राज्यातील आरोग्य विभागात 11000 कर्मचारी भरती ची माहिती यावेळी दादांनी दिली.

पत्रकार परिषेदे नंतर शहापूर राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे यांनी अजितदादांना तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याकरिता निवेदन दिले. तालुक्यातील शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळण्याकरिता आपण जातीने यावर लक्ष देऊ असं अजितदादांनी नमूद केलं आहे.

शहापूर मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत यावेळी आमदार दौलत दरोडा, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला, किसन तारमळे, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना तारळे, शहापूर तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे, युवा अध्यक्ष सुरज चव्हाण,भाऊ दरोडा, करन दरोडा आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने अजित पवार गटातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: