रामटेक – राजू कापसे
आज दिनांक 28 जानेवारीला पारशिवनी इथे ओबीसीचं एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न झालं. मराठ्यांना महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आरक्षणाच्या अध्यादेश वर आक्षेप नोंदविता नागपूर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी दिनांक 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी ला ओबीसी जनजागृती रथयात्रा काढण्याचे आयोजित केलेले आहे.
सदर रथयात्रा मध्ये हजारोंच्या संख्येने नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ओबीसी बंधू आणि भगिनींनी सहभागी व्हावे अशा प्रकारचा आवाहन डॉ राजेश ठाकरे जिल्हा समन्वयक राष्ट्रीय ओबीसी महासंघ द्वारे व इतर मान्यवरांनी केले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजींची शपथ घ्यावी “मराठ्यांना आरक्षण देताना कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणास धक्का लागणार नाही ” अशा प्रकारची ग्वाही सुद्धा द्यावी असेही आवाहन सरकारला करण्यात आले.
याप्रसंगी विदर्भ ओबीसी चे रमेश कारेमोरे ,राष्ट्रीय ओबीसी महासंघ राज्य उपाध्यक्ष कांचनताई माकडे , नाना उराडे रामटेक मौदा पारशिवनी तालुका समन्वयक , पारशिवनी येथील धरणे आंदोलनाचे आयोजक दीपक भोयर , लक्ष्मीकांत किरपाण,
प्रकाश डोमकी , डॉक्टर प्रमोद भड , सागर सायरे प्रतीक वैद्य ,विजय भुते ,परसराम राऊत ,कापसे सह अनेक मान्यवर या धरणे आंदोलनात सहभागी होते उत्कृष्ट उपस्थिती सह पारशिवनीकरांनी सदर धरणे आंदोलन आयोजित केला त्यानिमित्त त्यांचे विशेष धन्यवाद राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने करण्यात आले