एकीकडे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या मालेगावात विराट सभा होत असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज अचानक भेटीला आल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव काहीतरी घडणार काय?…
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकेकाळी शिवसेनेत एकाच पक्षात काम करत होते. ते दोघेही एकमेकांचे सहकारी होते. आजची भेट हे दोघांमधील चांगल्या संबंधांचे उदाहरण आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले होते.
गेल्या वर्षी मे महिन्यात राज ठाकरे यांच्या हिपचे ऑपरेशन झाले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला होते. याची माहिती मिळताच त्यांनी राज ठाकरे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या सर्व घडामोडी पाहता भविष्यात शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संबंध आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
यावर मुख्यंमत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधत हा शिष्टाचार होता, त्यात कोणताही राजकीय मुद्दा नव्हता. आम्ही कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा केलेली नाही. आम्ही लाऊड स्पीकर वाजवण्याबाबत चर्चा केली आहे. मी त्यांना सांगितले आहे की जे काही नियम आहेत ते प्रत्येकाने पाळले पाहिजेत. त्याचा आढावा घेतला जाईल…