पातुर तालुक्यातील सेमी क्रिटिकल मध्ये असलेल्या गावांना सेफ झोन मध्ये समाविष्ट करण्याची सुद्धा मागणी…
पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील पंचमी गावापैकी 53 गावे हे सेमी क्रिटिकल मध्ये येत असल्याने वैज्ञानिक अकोला यांची यादी नुसार प्रसिद्ध करण्यात आलेले गावे त्यानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत सुरू असलेल्या सिंचन विहिरी मध्ये अडचण येत आहेत सेमी क्रिटिकल मध्ये वैयक्तिक सिंचन विहीर मिळत नसून सामूहिक विहीर सिंचन मिळते त्यामुळे सामूहिक सातबारा जमा करणे विहिरीवर त्यांच्या हक्काची टक्केवारी ठरवणे हमीपत्र देणे यामध्ये खूप अडचणी येत आहेत त्यामुळे तालुका भरातील जनता या योजनेपासून वंचित राहणार आहे.
95 पैकी 53 गावे हे सेमी क्रिटिकल मध्ये असल्याने विहिरीचा लक्षांक होणे अवघड दिसत असल्याने त्याकरिता पातुर पंचायत समिती सभापती सुनीताताई अर्जुन टप्पे व उपसभापती इमरान खान मुमताज खान यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे,
तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीला दिल्यात आलेले 15 विहिरीच्या लक्षात हा रक्षांक गावातील शेतकरी तथा लोकसंख्येनुसार वाढवून देण्यात यावा कारण तालुक्यातील काही गट ग्रामपंचायत आहेत त्यांची लोकसंख्या व शेतकरी संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे बऱ्याच गरजू लावा पासून वंचित राहू शकतो कधीच ग्रामपंचायत मधील शेतकरी यांच्या लक्षात वाढवून देण्यात यावा जेणेकरून गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल व तालुक्यातील शेत जमिनी सिंचनाखाली येऊन उत्पन्न वाढ होईल.