Friday, November 22, 2024
Homeराज्यमिरजेत मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिउत्साहात साजरी करण्यात...

मिरजेत मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिउत्साहात साजरी करण्यात आली…

सांगली – ज्योती मोरे.

मिरजेत शिवजयंती मुस्लिम समाजाच्या वतीने पेढे व साखर एकमेकांना भरवून कार्यकर्त्यांना शिवजयंती साजरी केली यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने जैलाब शेख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हारअर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ..छत्रपती शिवाजी महाराज की जय …छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती शिवाजी महाराज की जय …आशा जयघोष देऊन परिसर दणाणून सोडले.

यावेळी जैलाब शेख म्हणाले की म्हणाले की शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते अठरा पगडीच्या जाती जमातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्यची स्थापना केली. शिवाजी महाराजयांच्या स्वराज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या पदावर अनेक मुस्लिम सरदार महाराजांनी नेमलेले होते मदारी मेहतर,हैदर काजी,रुस्तमे जमान, सुलतान खान,इब्राहिम खान, दाऊद खान, दर्या सारंग व सिद्धी हिलाल अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मुस्लिम सरदारांना महाराजांनी दिलेले होते व ती जबाबदारी मुस्लिम सरदारने पाईकपणेने पार पाडली.

महाराज हे मुस्लिमाचे शत्रू नव्हते ते शत्रू होते अन्यायाचे, अत्याचारी प्रवृत्तीचे…छत्रपतीनी न्याय,समता,स्वातंत्रता व बंधुता यावर आधारलेले निधर्मी राज्य निर्माण केले होते असे यावेळी जैलाब शेख म्हणाले यावेळी जमीर शेख,फारूक अत्तार,आयुब जातकर,सात गवंडी, ,नासिर शेख,अमीर धतुरे, अजीम कलंगडे,इमरान पकाली व अन्वर शेख या बहुसंख्य मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: