छत्रपती संभाजीनगर येथील हातमोजे बनविणाऱ्या कारखान्याला आग लागली. या आगीत होरपळून सहा कामगारांचा मृत्यू झाला. या कारखान्यात 10 ते 15 कामगार झोपलेले होते, रात्री 2,15 दरम्यानची घटना, घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या आग घटनास्थळी दाखल झाल्या, आता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून, मृत झालेल्या कामगारांना रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
अग्निशमन विभागाचे अधिकारी मोहन मुंगसे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात हातमोजे बनविण्याचा कारखाना आहे. पहाटे २.१५ च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आग संपूर्ण कारखान्यात पसरली होती. स्थानिक लोकांनी आम्हाला सांगितले की, पाच जण आत अडकले आहेत. आमचे अधिकारी कारखान्यात पोहोचले पण तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता. आम्ही सहा मृतदेह बाहेर काढले आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीवर लवकरच नियंत्रण मिळवले जाईल.
आग लागल्याचे कळताच कामगारांच्या नातेवाईकांनी कामगारांना वाचवण्यासाठी आरडाओरड सुरु केली. कंपनीसमोर मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या त्वरित दाखल झाल्या. अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी एकीकडे आग विझवण्याचे काम सुरु केले आणि दुसरीकडे कंपनीत असलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरु केली. आगीत मृत्यू झालेल्या सहा कामगारांपैकी चार जणांची ओळख पटली आहे. भुल्ला शेख (65), कौसर शेख (26), इकबाल शेख (26) आणि मगरूफ शेख (25) अशी त्यांची नावे आहेत.
कारखान्यात 10-15 कामगार झोपले होते
कारखान्यात काम करणाऱ्या एका मजुराचे म्हणणे आहे की, आग लागली तेव्हा आतमध्ये 10-15 कामगार झोपले होते. आगीचे लोळ पाहून कामगारांमध्ये घबराट पसरली. काही लोक तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले तर काही लोक आत अडकले.
#WATCH | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra: Fire breaks out in a factory in the Waluj MIDC area. Operations to douse the fire are underway. Further details awaited. pic.twitter.com/mY9ChJv8n8
— ANI (@ANI) December 30, 2023