Wednesday, July 24, 2024
spot_img
Homeमनोरंजनछत्रपती संभाजी महाराज यांच्या महतीचे गायन जय शंभूराया...

छत्रपती संभाजी महाराज यांच्या महतीचे गायन जय शंभूराया…

आनंदी वास्तू प्रोडक्शनच्या आनंद पिंपळकर यांचा पुढाकार

मुंबई – गणेश तळेकर

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणाचा, बलिदानाचा दिवस महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातली शिवप्रेमी,धर्मप्रेमी, शंभूप्रेमी जनता कधीच विसरू शकणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळा मध्ये दिडशे लढाया यशस्वीरित्या जिंकल्या.

थोरल्या महाराजांच्या महानिर्वाणानंतर दिल्लीच्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास व छत्रपती संभाजी महाराजांचे स्वरूप म्हणजे ईश्वर स्वरूपच आहे. ‘यदा यदाही धर्मस्य’ पद्धतीने धर्मरक्षणाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी पार पाडली नसती तर औरंगजेबाने महाराष्ट्रात नंगानाच केला असता.

छत्रपती संभाजी महाराजांचे पुण्यस्मरण म्हणून आनंदी वास्तु प्रोडक्शन निर्मित छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणारी व आर्ततेने केली गेलेली आरती नुकतीच प्रदर्शित झाली असून आनंद पिंपळकर यांच्या ‘आनंदी वास्तू’ या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही आरती पहायला मिळेल. ‘जय शंभूराया’ या आरतीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या महतीचे गायन केले आहे.

आरती ही देवतांची होते आणि छत्रपती संभाजी महाराज हे सर्व धर्मप्रेमींचे देवच आहेत.. त्यांच्या अखंड बुद्धिमत्तेने, शौर्याने, बलिदानाने त्यांचे देवत्व सिद्ध होते. देवतेची प्रत्येकाची संकल्पना ही वेगळी आहे पण छत्रपती संभाजी महाराज हे नावाप्रमाणेच शंभू महादेवच वाटतात आणि त्यांचे आर्ततेने स्मरण सुमनांजली म्हणजे हे आरती गीत आहे असे मत प्रसिद्ध वास्तूतज्ञ आनंद पिंपळकर यांनी व्यक्त केले. अत्यंत कमी वेळामध्ये हे शिवधनुष्य पेलण्याचे कार्य केवळ श्री शंभूराजांच्या आशीर्वादाने झाले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘जय शंभूराया’ या आरती गीताच्या चित्रीकरणाची सर्व जबाबदारी अगदी कमी कालावधीत दिग्दर्शक सुरज वामन यांनी पार पाडली असून अजय घाडगे यांनी सुंदर छायाचित्रण केलं, अक्षय पितळे व निनाद शिंदे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. हे गीत सोनू म्युझिकचे मारुती चव्हाण यांनी लिहिले आहे.

संगीत तेजस साळुंखे यांचे आहे तर संदीप रोकडे आणि दीक्षा वावळ यांच्या तडफदार आवाजामध्ये हे आरती गीत ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. हे आरती गीत शब्दबद्ध केलंय शुभम कुलकर्णी यांनी तर आनंद पिंपळकर,प्रणव पिंपळकर, धनश्री कदम, रोहित इंजनवारे यांच्या प्रमुख भूमिका असून निर्माती आहे अश्विनी पिंपळकर.

प्रत्येक शंभूभक्ताने छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण म्हणून दररोज हे आरती गीत ऐकायलाच हवे, असे आवाहन श्री आनंद पिंपळकर यांनी केले आहे. आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या youtube चॅनलवर ‘जय शंभूराया’ हे आरती गीत आपल्याला पहाता येईल.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: