पातूर : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून दुसऱ्या मुलीशी विवाह जुळवल्याने पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पातूर पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की,पीडितेची मावस बहीण हीचे लग्न दिनांक 28/04/2016 रोजी ग्राम काठीपाठी ता. जि. अकोला येथे झाले होते. त्या लग्नात पीडिता सुद्धा गेली होती तेव्हा तिचे वय 13 ते 14 वर्ष होते त्या लग्नामध्ये नातेवाईकांनी कपील गुलाबराव तायड़े याचे सोबत ओळख करुन दीली होती.
लग्न झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी कपील गुलाबराव तायडे याने पीडितेस फोनवर मेसेज करुन लग्नातील ओळख दाखवीली व दररोज फोनवर बोलु लागला. व म्हणत होता की, मी तुझा सोबत लग्न करतो, तुला चांगली वागणुक देउन चांगली ठेवील त्यावेळेस त्याची आई सुध्दा पीडित सोबत बोलत होती, मी तुला सुन म्हणुन करुन घेत आहे. अंदाजे 26/09/2016 रोजी त्याने पीडित मुलीला फोन करून नवीन बस स्टॅन्ड अकोला येथे बोलावले तिथे दोघांची भेट रात्री 08/00 वा. झाली त्याचे बोलणे सुरु असता तो सदर मुलीस एकदम म्हणाला की मी माझे आई वडीलांना सांगीतले आहे तुला घरी घेउन येत आहे तु माझे सोबत चिखलगाव येथे चल त्यानंतर दोघे त्याचे मोटारसायकलने चिखलगाव येथे रात्री अंदाजे 09/00 गेले असता आरोपी कपिल याने तिला त्याचे घरी न नेता त्याच्या मित्राच्या घरी नेले व लग्नाचे आमीष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले,त्यानंतर देखील अनेकवेळा पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
काही दिवसांनी आरोपी हा सैन्यात भरती झाला व ट्रेनिंग साठी सिकंदराबाद येथे निघून गेला,दरम्यान पीडिता ही जॉब साठी पुण्यात राहत असतांना आरोपी एक महिन्याच्या सुट्टीत पीडितेच्या पुणा येथील रूमवर दोन दिवस राहिला व परत तिच्याशी संबंध स्थापित करून आपल्या गावी चिखलगाव येथे आला,त्यानंतर त्याने पीडितेचा फोन ब्लॉकलिस्ट मध्ये टाकला असता सदर मुलीने नातेवाईकांना विचारणा केली असता त्याचे दुसऱ्या एका मुलीशी साक्षीगंध झाले असल्याचे समजल्याने पीडित मुलीने आपल्या पालकांसह पातूर पोलीस ठाण्यात येऊन आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.
सदरच्या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी कपिल गुलाबराव तायडे रा.चिखलगाव यांच्याविरोधात अप.क्र.406/22 कलम 376,376(2) (n), 376(3),506,कलम 3,4, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.