बिलोली – रत्नाकर जाधव
बिलोली येथील शासकीय गोदामातून शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांना गोदामपाल दरमहा धान्य कमी देत असून दुकानदारांना लाभार्थ्यांच्या रोषास सामोर्य जावं लागत आहे.या बाबतीत तहसीलच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तरी अधिकाऱ्यांकडून गोदमापालला अभय दिले जात असल्याचा आरोप स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत आहे.शासकीय गोदमातील गोदामपाल स्थानिकचा रहिवाशी आल्यामुळे दुकानदारांशी अरेरावी वाढली आहे.
केंद्र शासनाने मोफत स्वस्त धान्य देण्याची घोषणा झाल्या पासून लाभार्थ्यांची चांदी झाली असून बहुतांश लाभार्थ्यांकडून स्वस्त धान्याचा माल दुकानातून उचलून सरळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात आहे.परंतु या वृत्तीचा फटका हा स्वस्त धान्य दुकानदारांना बसत आहे.परंतु लाभार्थ्यांची ही वृत्ती तालुक्यात स्वस्त धान्याचा काळा बाजर करणाऱ्या सोबतच शासकीय गोदामच्या गोदामपालसाठी पर्वणी ठरला आहे.विशेष म्हणजे गोदामपाल हा स्थानिकचा रहिवाशी असल्यामुळे गोदामात स्वस्त धान्य दुकानदारांना अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप दुकानदारांकडून केला जात आहे.
गोदामपाल व पुरवठा विभागात काम करणाऱ्या कॉम्पुटर ऑपरेटर यांनी संगनमत करून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दमदाटी करून धान्य कमी देण्याचा प्रकार चालू केला आहे.विशेषतः शहरातील स्वस्त धान्य दुकानांना जून मध्ये जवळपास तीन ते चार क्विंटल माल कमी येत आहे.
या बाबतीत प्रभारी पुरवठा अधिकारी यांच्याकडे स्वस्त धान्य दुकानदारांनी तक्रार ही दिली आहे.परंतु पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून ही गंभीर दखल घेतली जात नाही उलट गोदामपाललाच अभय दिल्या जात असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांना धान्य देण्यासाठी अडचणी येत आहेत असा आरोप स्वस्त धान्य दुकानदारांकडून केला जात आहे.शासकीय गोदामपाल व पुरवठा विभागातील ऑपरेटर या दोघांनाही बदलण्यात यावे अशी मागणी होत आहे.